By  
on  

झी मराठी नाट्यगौरव २०२३ ! जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर तर नटश्रेष्ट दिलीप प्रभावळकर यांना विशेष रंगभूमी योगदान पुरस्काराने गौरविले जाणार

यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ मध्ये मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत करणार रसिकांचं मनोरंजन अनेक आश्चर्यानी भारलेला हा सुंदर सोहळा रंगणार येत्या ९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता.  विक्रमवीर ‘प्रशांत दामले’ यांना मराठी रंगभूमीवरील विक्रमी १२५०० नाट्यप्रयोगांनिमित्त झी मराठीची मानवंदना.  
 

सोबतच या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या  पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'.

तर ह्या वर्षीचा झी नाट्यगौरव २०२३ च्या 'जीवनगौरव पुरस्काराच्या' मानकरी ठरल्या त्या म्हणजे 'वंदना गुप्ते'. २५ डिसेंबर १९७० रोजी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, द गोवा हिंदू असोसिएशनच्या, मंगला संझगिरी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडीराज’ ह्या नाटकातून पहिल्यांदा रंगमंचावर आल्या. तिथपासून ते ‘.. आणि वंदना गुप्ते’, ह्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टांचा होता. मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.  

तसेच या सोहोळ्यात प्रेक्षकांना मराठी नाट्यसृष्टीत आघाडीचा नट शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे ‘अश्रूंची झाली फुले' ह्या नाटकातील प्रवेश सादर करणार आहे तसेच तब्बल २५ वर्षानंतर संतोष पवार 'यदा कदाचित' ह्या नाटकाचा प्रवेश कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे सारखे कलाकार साकारणार आहेत, विनोदाचा हुकमी एक्का आणि गेली २५ वर्ष रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेले नाटक  "सही रे सही" नाटकाचा प्रवेश भरत जाधव सादर करणार आहे. ‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे साकारणार असून ह्या नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे ह्या वंदना गुप्ते यांना मानवंदना देणार आहे. सोबत ‘मन्या आणि मनीची’ धमाल अनुभवता येणार आहे. यंदाच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे लेखन केलंय ते संकर्षण कऱ्हाडे याने.

तेव्हा एका तिकिटात बालगंधर्व ते सही रे सही पर्यंतची हाउसफुल्लचे बोर्ड झळकवलेल्या नाटकांचे प्रयोग पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे, झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ हा सोहळा ९ एप्रिलला संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive