By  
on  

Video : अमोल कोल्हेंचा नादचखुळा, कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी वर्कआऊट सोडलं अर्ध्यावर

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असात. आपल्या प्रत्येक प्रोजेक्ट्चे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करुन ते नेहमीच त्यांच्याशी कनेक्ट होतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. महाराजांची ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे  जनमानसात त्यांची तीच छबी निर्माण झाली आहे. 

अमोल कोल्हे सध्या कोल्हापूरात आहेत. कोल्हापुरात स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’सादर होणार आहे. या प्रयोगासाठी सर्व टीम कोल्हापूरात आहे. कोल्हापूर म्हटल्यांवर योगायोगानं खाणं आलचं. कारण कोल्हापूरची खाद्यसंस्कृती जगात भारी आहे. पण अमोल कोल्हे फिटनेस फ्रिक हेत. ते नित्यनेमाने वर्कआऊट करताना दिसतात.  पण कोल्हापूरची मिसळ पाहिल्यानंतर त्यांना देखील राहवलं नाही..त्यांनी देखील वर्कआऊट मध्येच सोडलं आणि कोल्हापूरी मिसळ खायला बाहेर पडले. चाहत्यांच्या पसंतीच्या ठिकाणीच त्यांनी मिसळ खाण्याचं ठरवलं आहे.

अमोल कोल्हे यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, नादखुळा..काटाकीर्रररर् मिसळ खायला कोल्हापूरात कुठं जाऊ ते सांगा? कमेंट करून सांगाआयकलं का कोल्हापूरकर ?? यायला लागतंय...कोल्हापुरात सादर होणार स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य!‘शिवपुत्र संभाजी’दि. ०७ ते १२ एप्रिल..दररोज सायंकाळी ६ वाजता. स्थळः तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर..त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि मिसळप्रेमींकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive