By  
on  

हास्यजत्रेतल्या या अभिनेत्यासोबत शिवाली परबची डेट, शेयर केला फोटो

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्वांचा आवडता कार्यक्रम. या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. हे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या शिवालीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आता तिने एका अभिनेत्याबरोबर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. अभिनेता निमिश कुलकर्णीबरोबरचा तिचा हा फोटो आहे. शिवाली व निमिश डेटला गेले होते. तो हातात हात घेतलेला एक खा्स फोटो तिने शेयर केलाय. 

शिवालीने निमिशचा हात हातात पकडलेला या फोटोमध्ये दिसत आहे. तर निमिश अगदी गोड हसत आहे. शिवालीने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट. क्युट बेबी”. शिवालीच्या या फोटोची सध्या बरीच चर्चा आहे. 

 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये निमिश कुलकर्णी, शिवाली परब आणि समीर चौघुले ह्यांची शिवाली हे खरंय.. ही सिरीज खुप गाजते. यात हे दोघं नवरा-बायकोचं पात्र साकारतात. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive