By  
on  

...ह्याला म्हणतात हाडाचा कलाकार ! प्रियाने केलं पतीचं कौतुक

अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार तर आहेतच पण सेलिब्रिटी कपलसुध्दा आहेत. अनेक मराठी मालिका व नाटकांमधून दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. प्रियानं नुकतीच नवरा शंतनूसाठी एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून सर्वांना नक्की शंतनूचा अभिमान वाटेल. सध्या प्रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

शंतनूच्या सफरचंद नाटकाचा प्रयोग नुकताच बोरिवलीमध्ये पार पडला. या प्रयोगाआधी एका महानाट्याच्या रिहर्सल दरम्यान शंतनूच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. त्याच अवस्थेत शंतनूने महानाट्याचे प्रयोग केले. हे प्रयोग झाल्यावर शंतनू मुंबईत आला. कारण मुंबईत त्याच्या सफरचंद नाटकाचे प्रयोग होते. शंतनूच्या पायाला दुखापत झाली होती. पण त्यामुळे संपूर्ण प्रयोग रद्द करणं शक्य तर नव्हतच शिवाय मोठं नुकसानही निर्मात्यांना सोसावं लागलं असतं. पायाला दुखापत असूनही शंतनूने प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

 प्रयोग सुरु होण्यापूर्वी नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार यांनी प्रेक्षकांना या गोष्टीची कल्पना दिली. शंतनू वॉकर घेऊन प्रयोग करेल असं प्रेक्षकांना सांगण्यात आलं होत. शंतनूने वॉकर घेऊन यशस्वीपणे प्रयोग केला.दिग्दर्शकांनी शंतनुच्या केवळ दोन मुव्हमेंट्समध्ये बदल केले आणि ठरलेला प्रयोग व्यवस्थित पार पडला. प्रयोग संपल्यावर प्रेक्षकांनीसुध्दा शंतनूला उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. 

 

 

पतीसाठी प्रिया मराठेने सुध्दा  एक खास पोस्ट लिहलीय, "Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.. हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते..पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हाडाचा कलाकार म्हणता येईल." 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive