By  
on  

आई कुठे काय करते फेम मधुराणीने साडी नेसून चालवली गाडी, “स्त्रीने वेळीच आपल्या आयुष्याचं…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.

मालिकेची नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकताच एक हटके व्हिडीओ शेयर करत तिने लक्ष वेधून  घेतलंं आहे. यात ती साडी नेसून कार चालवताना पाहायला मिळतेय. 

“अरुंधती… ऑन दी गो. प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं steering wheel आपल्या हातात घ्यायला हवं. हे असं…..!” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

 

मधुराणीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive