रितेश-जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड'ने प्रेक्षकांच्या हद्यावर गारुड केलं. २०२३ चा ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाने अक्षरश वेड लावलं. दाक्षिणात्य सिनेमा मजिलीचा हा मराठी रिमेक होता. अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखने या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण केलं.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सिनेमाने 100 दिवस सिनेमागृहात आपला तळ ठोकला आणि तुफान कमाई केली.
पण 'सैराट'ने केलेला कमाईचा रेकॉर्ड मॉडेल असंही म्हटलं जात होतं. 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर तब्बल १३० कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र या सिेनेमाला तो टप्पा गाठता आलेला नाही. प्रदर्शनाच्या काही दिवसातच या सिनेमाने २० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर ५० दिवसात सिनेमाने तब्बल ७४ कोटींचा गल्ला जमवला. मात्र त्यानंतर चित्रपटांचे शो कमी करण्यात आले व वेडची जादूही ओसरली. या सिनेमाने प्रदर्शनाच्या १०० दिवसात तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. एखाद्या मराठी सिनेमासाठी ही बाब थोडकी नव्हे तर उल्लेखनीय कामगिरीच आहे.
मराठी प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच हा सिनेमा एवढा लांबचा पल्ला गाठू शकला.