By  
on  

Photos : अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या 60 व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ९० ची दशकांत आपल्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीने मराठी सिनेसृष्टीत धम्माल उडवून दिली. अनेक सिनेमांमधून ह्या जोडीने रसिकांचं मनोरंजन केलं आणि ते करता करता नकळत एकमेकांच्या प्रेमातही पडले.

आता लग्नाला इतके वर्ष उलटली तरी यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सतत ते एकमेकांची काळजी घेताना पाहायला मिळतात. 

नुकताच निवेदिता सराफ यांचा 60 वा वाढदिवस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दणक्यात साजरा केला. यावेळी मोजकेच नातेवाईक व जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सगळ्यांनी मिळून निवेदिता यांच्या वाढदिवसाच छान सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

 

भाग्य दिले तू मला मालिकेत निवेदिता सराफ या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांच्या मालिकेच्या सेटवरसुध्दा त्यांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला होता. 

या बर्थडे पार्टीत निवेदिता सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीशी निगडीत छान गेम्ससुध्दा खेळण्यात आल्याचं दिसतंय.

अशोक मामांनी निवेदिता ताईंना केक भरवतानाचा हळवा, रोमॅण्टिक फोटो कॅमे-यात कैद झाला आहे. 

जवळचे मित्र सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी देखील निवेदिता यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive