शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीरच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. आता या ट्रेलरच्या निमित्ताने शाहिरांच्या आयुष्यातील महत्त्तवपूर्ण व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.
अभिनेता अंकुश चौधरीचा दमदार अभिनयाची छोटी झलक पाहायला मिळाली. शाहीर साबळेंशिवाय सिनेमात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, साने गुरूजी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे देखील दिसणार आहे.
आजवर अनेक सिनेमांमधून बाळासाहेबांची भूमिका अनेक कलाकारांनी साकारली आहे. परंतु शााहिर साबळेंच्या सिनेमातील बाळासाहेब हे तरुण उमेदीच्या काळातले आहेत.
बाळासाहेबांची भूमिका अभिनेता दुष्यंत वाघ ह्याने साकारली आहे. पिपींगमूनमराठीशी बोलताना दुष्यंत म्हणाला, जेव्हा पहिल्यांदा केदार शिंदेंनी ही भूमिका तू करतोयस असं सांगितलं, तेव्हा मी त्याला म्हणालो होतो, दादा पण मी बाळासाहेबांसारखा दिसेन का. तेव्हा तो म्हणाला तू कर तर खरं. त्याने सांगितल्याप्रमाणे मी केलंय. कुठेही त्यांची नक्कल केलेली नाही. अगदी आपण मित्रांशी बोलतो तसा शाहिर आणि बाळासाहेबांमधला संवाद दिसेल.
दुष्यंतने यापूर्वी अनेक मालिका, नाटक व मराठी-हिंदी सिनेमांमधून काम केलं आहे. 2005मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमात त्यानं माधव आपटेच्या मुलाची भूमिका केली. 2009मध्ये आलेल्या 3 इडियट्स या सिनेमा त्याने सेंटीमीटर ही प्रसिद्ध भूमिका साकारली होती.
नुकत्याच आलेल्या धर्मवीर या सिनेमातही दुश्यंतनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.