By  
on  

भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?, सायली म्हणते...

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील ती सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. . तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली होती. आता सायलीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत सायली वैयक्तिक आयुष्याविषयी बरंच काही बोलली. यावेळी राजकीय टिपणी केल्यानंतर तुला ट्रोल केलं जातं. याकडे तू कशी पाहते? असं विचारलं गेलं.

यावर सायली म्हणाली, 'आता मी एका पक्षामध्ये आहे. त्या पक्षाच्या मी पदावर आहे. तर अर्थातच त्या पक्षाची बाजू मी मांडणार. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ते मी स्वीकारते. ही टीका स्वीकारणं गरजेचंच आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात. त्यामुळे टीका होत असली तरी त्याचा मला फरक पडत नाही.'

 

 

पुढे ती म्हणाली, 'दुसऱ्या पक्षाचं एखादं काम आवडलं तर तेही मी सांगणार. पण बाजू मांडताना मी माझ्या पक्षाची मांडणार हे इतकं साधं गणित आहे. जे महाराष्ट्र, देशासाठी चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणण्याचीही आपल्यामध्ये वृत्ती असावी. मीही ते फॉलो करते. पण त्यावरही टीका होते त्यासाठी धन्यवाद. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याबाबत बोलत आहेत याचा मला आनंद आहे.'


भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असाही प्रश्न सायलीला यावेळी विचारला गेला. त्यावर सायली म्हणाली, 'माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडेल.' असं ती म्हणाली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive