मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्तसुध्दा ते एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. अशीच एक जोडी आहे ती महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरची. सोनाली कुलकर्णीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सोनाली आणि फुलवा आमरस पुरी बनवण्याची तयारी करत असल्याचं दिसून येत आहे.
सोनाली कुलकर्णीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे की, तिला आमरस पुरी प्रचंड आवडते. आणि सीझनच्या पहिल्या आमरस पुरीचा आस्वाद ती मराठमोळी कोरिओग्राफर आणि तिची मैत्रीण फुलवा खामकरच्या घरी घेते. हा तिचा दरवर्षीचा ठरलेला क्रम आहे. व्हिडीओमध्ये फुलवा आणि सोनाली आंबे पिळून आमरस करताना दिसून येत आहेत. सोनालीने आपण पहिल्यांदाच आमरस बनवणार असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय गृहिणींसाठी एक खास सल्लाही दिला आहे. आंबे फ्रिजमध्ये कधीही ठेऊ नये कारण गारमुळे त्याची चव कमी होते असंही सोनलीने सांगितलं आहे.
हा धम्माल आमरसाचा व्हिडीओ नेटक-यांना खुप भावतो तर आहेच पण त्यांच्या तोंडालासुध्दा पाणी सोडतोय