By  
on  

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांचा विजय, प्रसाद कांबळी पराभूत

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीची गेले काही दिवस बरीच चर्चा रंगली होती. या निवडणुकीसाठी रविवारी 16 एप्रिल रोजी मतदान पार पडले. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगांव येखील साहित्य संघ मंदिर या केंद्रांवर मतदान झाले. तर काल रात्री मतमोजणी होऊन याचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी ठरले आहेत.. मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे

प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह' पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर नवनाथ कांबळी (प्रसाद कांबळी) यांच्या आपलं पॅनल पराभूत झालं.प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये  विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे. तर प्रसाद कांबळी यांच्या . पॅनलमध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे हे कलाकार आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive