By  
on  

अलका कुबल यांनी सांगितलं," हिंदीत तोकडे ड्रेस घालून छोट्या भूमिका करण्यापेक्षा..."

मराठी सिनेसृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचं स्थान अबाधित आहे. आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. सोशिक व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अलका कुबल अवघ्या स्त्री वर्गाच्या प्रचंड लाडक्या आहेत.  'माहेरची साडी' या चित्रपटातून त्यांना जी ओळख मिळाली ती कायमची. त्यांची त्या सोशिक सुनेची प्रतिमा आजही ठसठीत आहे. अलका यांनी मराठी सिनेमा, मालिका व नाटक सर्वत्र आपल्या अभिनयाची जादू दाखवली. परंतु या आघाडीच्या अभिनेत्रीला हिंदी सिनेमातून ऑफर आल्या होत्या का त्या त्यांनी स्विकारल्या का, की स्पष्ट नाकारल्या  याबाबत  त्या व्यक्त झाल्या. 

. ललिता ताम्हणे यांनी ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.प्रत्येकच कलाकाराला हिंदीमध्ये काम करावं असं वाटत असतं मग तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम करावंसं वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर अलका कुबल म्हणालेल्या, ''माहेरची साडी' चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या मात्र मी त्या नाकारल्या. मी 'धार' नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत होते. चित्रपटात ती भूमिका फारच महत्त्वाची होती. अनेकदा मी भूमिका निवडताना तिची लांबी न बघता त्याची गरज बघते. ते पात्र चित्रपटात किती महत्वाचं आहे ते पाहते. या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या सहकलाकाराच्या ओळखीचा असल्याने मी ती भूमिका केली. पण हिंदी चित्रपटासाठी वाट्टेल तसे तोकडे ड्रेस घालण्याची आणि शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती.'

त्या पुढे म्हणाल्या, 'तसंच हिंदी चित्रपटात उगाचच छोटंसं पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का? मी दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या ‘नया ज़हर’ नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. पण तो चित्रपट अजिबात चालला नाही. तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हेसुद्धा कोणाला कळलं नाही. त्यामुळे अशा भूमिका करून काहीही उपयोग नाही हे मला जाणवलं. त्यामुळे मी ठरवलं की हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत.'

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive