प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर अनेक फोटोस् पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या बहारदार निवेदनाचं नेहमीच कौतुक होतं. रानबाजार या वेबसिरीज नंतर ती प्रचंड चर्चेत आली .तिच्या वाय या सिनेमातील भूमिकेसाठी सुद्धा तिचं कौतुक करण्यात आलं.
नुकतंच एका मुलाखतीत प्राजक्ताला तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण, असं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली, 'मला सलमान खान आवडायचा.'
प्राजक्ता पुढे म्हणाली कि, 'मी अगदीच लहान होते…दोन-तीन वर्षांची. माझ्या आतेभावाचा तो खूप आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खान सोबत लग्न करायचं.' प्राजक्ताने केलेल्या या खुलास्याची आता चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
प्राजक्ताला सलमान आवडतो ऐकून नेटक-यांमध्ये धम्माल कॉमेंट्सचा वर्षावसुध्दा सुरुय.