By  
on  

Video : सिद्धार्थ चांदेकर विकतोय 'ताक', तुम्हाला हवं असेल तर करा ऑर्डर !

सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे सिनेसृष्टीतलं एक गोड कपल. या सेलिब्रेटी जोडी नेहमीच प्रेक्षकांची लाडकी ठरते. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मागच्या वर्षी ही जोडी लग्नबंधनात अडकली. दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि धम्माल रील्स व्हिडीओ चाहत्यांशी ते शेअर करतात. 

नुकताच सिध्दार्थने असाच एक धम्माल व्हिडीओ मितालीसोबत शूट केला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. वातावरणात उष्णता वाढली आहे. अशावेळेस थंड प्यावसं वाटतं. त्यातही घरबसल्या ताक मिळालं तर याहून चांगलं काहीच नाही. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला देखील थोडं ताक प्यावसं वाटलं. म्हणून त्यानं लगेच त्याच्या बायोकला म्हणजे मितालीला ताकाची ऑर्डर द्यायला सांगितली. तिनं पण लगेच ताकाची ऑर्डर दिली. त्यानंतर ताकाची ऑर्डर देखील आली. पण झालं असं की, ते ताक थोडं नव्हतं तर आठ लिटर एवढं होतं.मितालीन आठ लिटर ताकाची ऑर्डर एका दिवशी दिली. त्यामुळं एवढं ताक कोण पिणार असा सिद्धार्थला प्रश्न पडला आहे. म्हणूनच त्याने हे जर ताक कोणाला हवं असेल तर त्याने लवकर ऑर्डर द्या असं म्हटलंय. 

 

सिध्दार्थ-मितालीच्य या ताक प्रकरणावर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या भन्नाट प्रतिक्रीया येत आहेत .  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive