By  
on  

यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ प्रसाद ओकला जाहिर

चित्रपट व नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला मास्टर दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणा्र आहे. ही आनंदवार्ता प्रसादने सोशल मिडीयावरुन चाहत्यांना दिली आहे. यात त्याने मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचे परिपत्रक शेअर केले आहे. त्याबरोबर त्याने त्याला एक सुंदर  कॅप्शनही दिले आहे.

 

प्रसाद ओकची पोस्ट

“अत्यंत आनंदाची बातमी “

या वर्षीचा…
“मास्टर दीनानाथ मंगेशकर
विशेष पुरस्कार”
मला जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे…!!!

अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो…!!!”, असे प्रसाद ओकने म्हटले आहे

 

 

 

 

 

धर्मवीर सिनेमातील  आनंद दिघेंची व्यक्तिरेखाा साकारून प्रसाद ओकने अभिनयाची एक वेगळीच उंची गाठलीय. हा पुरस्कार जाहिर झाल्याने प्रसादवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive