By  
on  

हिंदी कलाविश्व गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा डान्स व्हिडीओ पाहिलात का?

प्रसिध्द युट्यूबर मोस्टली सेन फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि कप सॉंगमुळे सर्वांची लाडकी बनलेली ्प्रसिध्द अभिनेत्री मिथीला पालकर या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. युट्यूब आणि डिजीटल विश्व गाजवल्यानंतर या दोघींनी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणूनसुध्दा एक उत्तम स्थान निर्माण केलं आहे. 

दोघींचीसुध्दा तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मिथीला आणि प्राजक्ताला डान्सची खुप आवड आहे. म्हणूनच या दोघींनी एकत्र डान्स व्हिडीओ शूट करुन तो चाहत्यांसोबत शेयर केलाय. विशेष म्हणजे दोघींनी सेम आऊटफिट यावेळी कॅरी केलंय. ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्ल्यू डेनिम त्यांनी घातलीय. यात दोघीही गोड दिसतायत. डान्स पार्टनर फॉर लाईफ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

मिथीला व प्राजक्ताच्या या व्हिडीओला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असून आत्तापर्यंत 45 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive