By  
on  

शालू, नथ, भांगेत कुंकू आणि गजरा वीणा जगताप म्हणतेय “प्यार हुआ…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप नेहमीच चर्चेत असते. करिअरप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे ती नेहमी प्रकाशझोतात असते. सोशल मिडीयावर वीणा नेहमीच सक्रीय असते. अनेक फोटो-व्हिडीओ ती पोस्ट करते. चाहते तिला भरभरुन दाद देतात. वीणाचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. 

वीणाने नुकतेच काही सुंदर फोटो शेयर करत चाहत्यांचं लक्ष तर वेधून घेतलंच आहे. परंतु तिच्या कॅप्शनमुळे चाहते प्रचंड विचारात पडले आहेत, कारण वीणा लग्नबंधनात तर अडकत नाहीय ना असा प्रश्न त्यांना पडलाय. या फोटोत ती  ती छान चॉकलेटी रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. त्याबरोबर तिने गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपारिक लूकही केला आहे. विशेष म्हणजे वीणाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या भांगेत कुंकू पाहायला मिळत आहे.

वीणाने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. यात तिने ‘प्यार हुआ,,,,इकरार हुआ’ असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.
वीणाच्या या फोटोंवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करत ती करतेय का, कोण ाहे तो नशिबवान असं विचारतायत. 

दरम्यान  काही दिवसांपूर्वी वीणाने अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. त्यानंतर तिने गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत नवीकोरी गाडी खरेदी केली होती
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive