By  
on  

'आई कुठे काय करते' च्या अरुंधतीने उष्माघातापासून बचावासाठी सांगितला खास उपाय

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.
 

मालिकेची नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकताच एक हटके फोटो शेयर करत तिने चाहत्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. 
रखरखतं ऊन पडतंय आणि उष्माघातामुळे आपल्या आजुबाजूला अनेक दुर्घटना घडल्याचंही चित्र आहे. कामाव्यतिरिक्त घराबाहेर दुपारी १२ ते ४ या वेळेत पडू नये असं सांगण्यात येतं. पण कामासाठी प्रत्येकाला घराबाहेर जाणं आवश्यक असतंच. मग गॉगल, टोपी, छत्री असे पर्याय वापरण्यास सांगितलं जातं. आई कुठे काय करते फेम मधुराणीने एक खास पर्याय सांगितला आहे. 
 

नुकतंच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच कडक्याच्या उन्हात कशी काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स दिल्या आहेत. तसेच तिने काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

 

 

ताकाचा ग्लास हातात घेतलेला एक छानसा फोटो पोस्ट करत ती म्हणते, “मित्र मैत्रिणींनो, प्रचंड उन्हाळा आहे … आणि त्यातही घराबाहेर पडून आपली कामं करत राहणं तर भाग आहे. अशावेळी ताक , नारळपाणी , सरबत पीत राहून आपली काळजी घ्यायची. तुम्हीही स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घेत रहा”, असे मधुराणी प्रभूलकरने म्हटले आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive