अभिनेता संकर्षण क-हाडे रंगभूमीवरील दमदार आणि आजच्या पिढीला रुचणारी नाटकं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो.नुकतंच संकर्षण क-हाडेच्या नियम व अटी या नाटकाला दिनानाथ मंगेकर पुरस्कर जाहिर झाला आहे. पण त्याचबरोबर त्याच्या निवेदनाच्या हटके शैलीमुळेसुध्दा तो खास प्रसिध्द आहे. आम्ही सारे खवय्ये या महाराष्ट्रातल्या तमाम गृहिणींचा आवडता पाककलेचा कार्यक्रम तो जबरदस्त सादर करतो. अभिनयासोबतच त्याच्या या कार्यक्रमामुळे तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनलाय.
संकर्षणला दोन जुळी मुलं आहेत. संकर्षणला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव स्रग्वी आणि मुलाचं सर्वज्ञ असं आहे. संकर्षणला कामातून सु्टटी मिळाल्याने त्याने मुलांसोबत धम्माल वेळ घालवलाय. उन्हाळ्याचे दिवस आहेत. नुकताच त्यानं एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्रग्वी आणि सर्वज्ञ बाथटबमध्ये आंघोळ करत आहेत. संकर्षण दोघांच्या पुढ्यात बसलाय आणि त्यांच्याबरोबर धम्माल करतोय. बाप लेकांचा हा गोड फोटो शेअर करत संकर्षणनं म्हटलं, बाबाला सुट्टी असली की अश्शी मज्जा असते.