.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी आणि प्रसिध्द अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मिडीयावर कायमच सक्रीय असतात. अनेक अपडेट्स त्या चाहत्यांपर्यंत पोहचवतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ आणि अनिकेत सराफ यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना निवेदिता यांनी अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
निवेदिता सराफ यांची पोस्ट
“आज आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे,
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
प्रिय अनिकेत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अपार मेहनत, संवेदनशीलता, विनोदबुद्धी आणि विश्वासाच्या जोरावर तू ज्या पद्धतीने स्वत:च्या पायावर उभा राहिलास, त्याबाबत आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
खूप खूप प्रेम”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.
दरम्यान अनिकेत अशोक सराफ हा प्रसिध्द शेफ असून परदेशात असतो. पाश्चात्य पध्दतीचं जेवण बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. सोशल मिडीयावर त्याचे रेसिपीचे व्हिडीओ पाहायला मिळतात.