By  
on  

Video : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकने केला नव्या घरात गृहप्रवेश, म्हणते “कधी कधी मुली...”

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना मानसी नाईकवर चाहते नेहमीच फिदा असतात.  ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. या गृहप्रवेशाचे फोटो आणि व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. मानसीच्या या गृहप्रवेशानिमित्त चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे. 

मानसीचे आई-बाबा आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मानसीने गृहप्रवेश केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मानसीने हा गृहप्रवेश करण्यासोबतच छोटेखानी पूजासुध्दा केली. यावेळी नैवेद्यासाठी मानसीने स्वत:च्या हाताने खास पदार्थ बनवला होता. मानसी ही स्वयंपाकघरात पुरी करताना त्या तळताना दिसत आहे. त्याबरोबरच ती खीर बनवल्याची झलकही दाखवताना पाहायला मिळत आहे. “मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं, कधी कधी मुली तुमच्याकडे बघून पण हसतात”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. 

 

मानसीच्या या व्हिडीओवर चाहते अनेक प्रतिक्रीया देत आहेत. . ‘याचा अर्थ मानसीला जेवण बनवता येते’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एकाने “अशी बनवणारी असेल तर मी जळलेल्या पुऱ्या सुद्धा चवीने खाईन..” अशी कमेंट केली आहे.तर “सर्वगुण संपन्न”, अशी कमेंट एकाने मानसीच्या व्हिडीओखाली केली आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive