By  
on  

जॉनी लिवर यांनी पाहिलं ‘मी स्वरा आणि ते दोघे’ नाटक, निवेदिता सराफ यांनी शेयर केला फोटो

निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.

निवेदिता सराफ यांचं  ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. या नाटकाच्या प्रयोगाला दस्तुरखुद्द जॉनी लिव्हर यांनी हजेरी लावली होती. यावेळेचा खास फोटो शेयर करत निवेदिता म्हणतात, “माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि व्यक्ती असलेले जॉनी भाऊ माझे ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक पाहायला आले. ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई”. 

 

या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive