By  
on  

Video : "घराचा कॅफे केलाय बाईंनी..." उमेश कामतने मांडली व्यथा

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. तर कधी त्यांच्यातील अवखळ मस्तीसुध्दा पाहायला मिळते. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा या जोडीची अफलातून केमिस्ट्री सोशल मिडीयामुळे चाहत्यांपर्यंत पोहचते. 

नुकतंच उमेश कामतने एक धम्माल व्हिडीओ शेयर करत चाहत्यांना खुश करुन टाकलं आहे. प्रिया बापटला कॉफी किती आवडते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. प्रियाच्या सोशल मिडीया स्टोरीज- पोस्टमधून ते सतत जाणवतं. ती एक जबरदस्त कॉफी लव्हर आहे. विविध कॉफी शॉप्समध्ये जाऊन गरमागरम कॉफीचा आस्वाद घ्यायला तिला खुप आवडतं. पण घरातसुध्दा प्रियाला कॉफी सतत हवी असते. 

या व्हिडीओत उमेश हा कॉफी बनवताना दिसत आहे. तो कॉफी पावडर, दूध टाकून ती कॉफी बनवतो आणि त्यानंतर प्रियाला दोन वेळा आवाज देत कॉफी तयार असल्याचे सांगतो. ‘प्रिया कॉफी’, असेही तो एकदा बोलतो. मात्र प्रिया बापट काहीही प्रतिक्रिया देत नाही. त्यानंतर उमेश ‘कॅपेचिनो फॉर प्रिया’ असे बोलतो. त्यानंतर ती लगेचच ‘आले’ असा आवाज देते. यावर उमेश हा चिडतो. त्याने या व्हिडीओवर “सारखं कॅफेमध्ये जाण्याची सवय असलेल्या बायकोला घरी कॉफी देणाऱ्या नवऱ्याची कथा”, असे लिहिले आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

व्हिडीओला उमेशने भन्नाट कॅप्शन दिले आहे. “घराचा कॅफे केलाय बाईंनी.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive