अमित ठाकरें विषयी डॉ. अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत

By  
on  

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी अमित राज ठाकरे यांच्यासाठी केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. विविधांगी भूमिका साकारून अमोल कोल्हेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली.

अमोल कोल्हे नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.यात त्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. 

यावेळी त्यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासोबत झाली. याच भेटीबद्दल अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे वक्तव्य तर चर्चेत आहेच शिवाय या भेटीचा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अमित ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी पोस्ट लिहिली आहे. “जमिनीवर पाय असलेल्या अमित ठाकरेंना भेटून आनंद झाला,” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. अमोल कोल्हेंची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्यावर अनेकांनी कमेंटही आल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Recommended

Loading...
Share