By  
on  

ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते... कपड्यांवरून मिलिंद गवळी यांची सूचक पोस्ट

 'आई कुठे काय करते'चे अनिरुध्द म्हणजेच अभिनेते मिलींद गवळी सोशल मिडीयावर खुप सक्रीय असतात. त्यांच्या सोशल मिडीया पोस्टची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. आताही त्यांनी महागड्या कपड्यांवरून २ पोस्ट केल्या आहेत. काहींना कपडे कमी पडतात तर काहींना कमी असलेलेदेखील खूप वाटतात. असं त्यांनी लिहिलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे.

 

मिलींद गवळींची पोस्ट

 

 

ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, आणि ज्यांना कपड्यांची आवड आहे, ते घेतात असे कपडे,
Mulberry silk, जगात सगळ्यात महाग कापड
Kanjeevaram silk, या साड्या खूप महाग असतात
Muga silk हे घ्यायला खूप पैसे मोजावे लागतात.
“विकून लोकर “the most expensive and luxurious fabric in the world. Vicuna Wool comes from Peru. या ची किंमत ?
या अशा कपड्यांची किंमत विचारूची नसते.
पण कधी कधी तुमचं काम असं असतं की तुम्हाला कपडे विकत घ्यावेच लागतात,
विशिष्ट प्रकारचे कपडे तुम्हाला घालावेच लागतात, तुमच्या कामाचं स्वरूप असं असतं की तुम्हाला त्या पद्धतीचेच कपडे घालून ते काम करावे लागतात, जसं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ट्राऊझर, फॉर्मल शर्ट, फॉर्मल शूज, काही ना टाय घालावा लागतो तर काहींना सूट पण घालावा लागतो,
काहींचं काम वेगळं असतं, जसा अमेरिकन वर्किंग क्लास साठी जीन्सचा शोध लागला, jeans हा प्रकार जगभरामध्ये आता सगळीकडे वापरला जातो, working class पण आणि fashion म्हणून पण. हे झालं सगळं जनरल , common पण अन कॉमन वेगळी माणसं असतातच की ,
मग अशी काही माणसं डोळ्यासमोर येतात,
हि माणसं फार वेगळी असतात, उदाहरणार्थ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्या वेळेला ते आपल्या देशाचे प्रेसिडेंट झाले
राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आता बंद गला suit तुम्हाला घालणं compulsory आहे, dress code,
आयुष्यभर शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या माणसाला अचानक बंदगला suit जोधपुरी सारखा सूट घालायचा म्हणजे, आली खा पंचायत.
डॉक्टर अब्दुल कलाम यांची अडचण झाली आता गळ्याचे बटन लावून भाषण करायचं त्यांना फार कठीण जाणार असं त्यांना वाटलं, त्यांनी टेलरला सांगितलं, - “My colleagues say that it chokes the throat. I don’t want my throat to get choked and I can’t express my views and thoughts.”
असा बंद गळा सूट बनव की ज्याचा गळा बंद नको आहे मला,
कशा पद्धतीने तो सूट बनवला गेला आणि आता त्याला अब्दुल कलाम सूट असं म्हटलं जातं , ज्याचा गळा बंद नाही,
आपल्या देशाचे काही प्रेसिडेंट रिटायर झाल्यानंतर ट्रक ट्रक भरून सामान दिल्ली वरून त्यांच्या बंगल्यात घेऊन आले होते ( नंतर ते त्यांना परत करावं लागलं होतं)
पण डॅाक्टर कलाम was an exception, an inspiration & Great human
पण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम गेले त्यावेळेला त्यांच्याकडे
2,500 books, a wrist watch, 6 shirts, 4 trousers, 3 suits and a pair of shoes
एवढेच कपडे होते.
. हे एक उत्तम उदाहरण आहेत की शक्तिशाली व्यक्तिमत्वाच्या साठी अतिरिक्त वस्त्र आवश्यक नाहीत.
यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive