मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरते. तिच्या सहज-संदर अभियाने सजलेल्या गोष्ट एका पैठणीची सिनेमाला यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
नुकतंच सायलीनं नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय.
बुट्ट्यांची सोनेरी काठ असलेली हिरवीगार साडी सायलीनं यात नेसली आहे.
केसात मोगऱ्याचा गजरा आणि गळ्यात सिल्वर, गोल्डन आणि मोती अशा तिन्ही प्रकारचे दागिनी सायलीनं घातलेले पाहायला मिळतायत.
या दागिन्यांमध्ये दिसणाऱ्या त्या सोन्याच्या आकर्षक दागिन्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या दागिन्याला सरी असं म्हणतात. सरी हा पारंपरिक दागिना असून सध्या हा दागिना बाजारात ट्रेडिंगमध्ये आहे.
सायलीच्या लुकनं चाहत्यांना भुरळ पाडलीय.