पाठकबाई आणि राणादा ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लग्नबंधनात अडकली. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा शाही लग्नसोहळा डिसेंबरमध्ये पार पडला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा एकत्र आहे. दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आता अक्षया व हार्दिक त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे त्यांच्या प्रत्येक पोस्ट, व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतंच.
आता त्यांच्या साखरपुड्याला १ वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने हार्दिकने अक्षयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हार्दिक आणि अक्षया यांनी ३ मे २०२२ रोजी साखरपुडा केला होता.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं, 'तू माझी आहेस, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, माझं प्रेम, ती नेहमीच तू होतीस... माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदी क्षण. साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!'