By  
on  

TDM चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा धक्कादायक निर्णय

मराठी सिनेमांना थिएटरमध्ये स्क्रिन नं मिळणं हा मुद्दा नवीन नसला तरी हा महत्त्वाचा प्रश्न सातत्याने समोर येतोय. तेसुध्दा आशयघन आणि सर्वोतत्म कटेट असलेल्ंया सिनेमाबाबतीतसुध्दा हे घडतंय.राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम सिनेमाला हा अनुभव येत आहे. त्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांनी या सिनेमा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना कळवला आहे.

भाऊराव क-हाडे लिहतात,  'रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला 'टीडीएम' सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी 'टीडीएम'चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

 

टीडीएम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. हा सिनेमा २८ एप्रिला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर या सिनेमाला स्क्रिन मिळत नसल्याचं समोर आलं आहे. हा  सिनेमा पाहता येत नसल्यानं प्रेक्षकांची घोर निराशा झाली आहे.

 

टीडीएमला स्क्रिन न मिळाल्यानं कलाकारांनी काही दिवसांपूर्वी थिएटरमध्येच रडत रडत आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील टीडीएमला पुरेशा स्क्रिन्स देण्यासंदर्भात ट्विट केलं होतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive