Photos : सोनाली कुलकर्णीचा रणरागिणी अवतार पाहिलात का?

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. तिचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची जशी चाहत्यांना उत्सुकता असते तशीच तिच्या सोशल मिडीयावर ती शेयर करत असलेल्या नवनव्या फोटोशूटची असते. अगदी चातकाप्रमाणे चाहते तिच्या फोटोशूट्सची वाट पाहत असतात.

नुकतंच सोनालीने आपल्या रणरागिणी अंदाजाने सर्वांनाच संमोहित करुन टाकलं आहे. एका प्रसिध्द मासिकासाठी सोनालीने हे खास फोटोशूट केलं. सोनालीचा आगामी सिनेमा मोगलमर्दिनी ताराराणी या सिनेमाच्या थीवर हे फोटोशूट आधारित आहे. 

कपाळावर गडद चंद्रकोर, डोळ्यात स्वाभिमान, हातात तलवार अशा मराठमोळ्या लूकमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे.

सोनालीने लिहलंय, 'भाळी सौभाग्याचा केशरी तिलक मिरवावा इथेच घ्यावा जन्म पुन्हा इथे मृत्यू यावा आई तुझ्याच कारणी देह माझा पडावा मराठा तितुका मेळवावा….महाराष्ट्र धर्म वाढवावा''

Recommended

Loading...
Share