अभिनेता अमेय वाघचं हल्ली काय सुरु आहे, याचा काही नेम नाही. कधी म्हणतो मुलीसाठी नाव सुचवा तर कधी म्हणतो गर्लफ्रेंड तर पायजे ना यार..! त्याामुळे त्याच्या मनात नक्की काय सुरु आहे, याचा अंदाज कोणाला नाही. अहो, पण तुम्हाला माहितीय का त्याचा हा सर्व आटापिटा कशासाठी सुरु आहे. तर त्याचं असं आहे, 'गर्लफ्रेंड' हा त्याचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा एक जबरदस्त आणि हटके टीझर नुकताच उलगडला आहे.
'गर्लफ्रेंड' या आगामी सिनेमात गर्लफ्रेंडच्या शोधात असलेल्या एका कॉलेज तरुणाची भन्नाट कथा पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हा टीझर पाहून येतोय. त्यामुळे एकूणच सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
https://www.instagram.com/p/Bxbpz72D2qC/?utm_source=ig_web_copy_link
अमेय वाघने काही दिवसांपूर्वी ‘मुलीसाठी नाव सुचवा’ अशी पोस्ट इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती. अमेयने ही पोस्ट टाकताक्षणी अमेयवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. अखेर या पोस्ट मागील खरा अर्थ उलगडला. अमेयने आपल्या आगामी चित्रपटासाठी ही प्रोमोशनची युक्ती वापरली. आपल्या इंस्टाग्रामवर आगामी चित्रपटाचं एक पोस्टर त्याने चाहत्यांसोबत शेयर केलं होतं.