प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे प्रथमेश परबची ‘टकाटक’ लव्हस्टोरी

By  
on  

आपल्या सगळ्यांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब पुन्हा एका लव्हस्टोरीतून रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘टकाटक’ असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. या सिनेमात तो अभिनेत्री ऋतिका श्रोत्रीसोबत दिसणार आहे. पर्पलबुल एंटरटेनमेंट आणि गाववाला क्रिएशनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. लव्हस्टोरीला असलेला कॉमेडीचा तडका हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

https://www.instagram.com/p/Bxbp1JynKrP/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे. मिलिंद यांनी आतापर्यंत ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’, या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. या सिनेमाची पटकथा मिलिंड कवडे आणि अजय ठाकूर यांची आहे. याशिवाय प्रदीप पटवर्धन, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, हे कलाकारही या सिनेमात आहेत. हा सिनेमा २८ जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share