मुक्ता बर्वे हे नाव प्रगल्भ अभिनयाशी जोडलं गेलं आहे. आजवर मुक्ताने रसिकांना तिच्या उतम अभिनयाचा परिचय करून दिला आहे. रंगभूमी, सिनेमा आणि मालिका या प्रत्येक क्षेत्रात मुक्ताने यशस्वी मुशाफिरी केली आहे.
‘घडलंय बिघडलंय’ या मालिकेतून मुक्ताने करीअरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’ या नाटकातून तिने रंगभूमीवर अभिनय कौशल्य आजमावलं. ‘चकवा’मधील छायाची व्यक्तिरेखा तिची पदार्पणातील व्यक्तिरेखा ठरली.
त्यानंतर अनेक व्यक्तिरेखांवर मुक्ताने अभिनयाची छाप सोडली. पण तिला खरी ओळख दिली ती ‘जोगवा’ या सिनेमाने. सिनेमानंतर तिला मालिकेमार्फत प्रसिद्धीची चव चाखता आली.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील तिने साकारलेली राधा रसिकांच्या पसंतीस उतरली. तिचा आणखी एक उल्लेखनीय सिनेमा म्ह्णजे ‘मुंबई पुणे मुंबई’ सिनेमा. यातील सडेतोड, प्रॅक्टीकल गौरी सगळ्यांनाच आवडली. याच्या पुढच्या दोन सिनेमातील तिचा अभिनयही रसिकांना आवडला.
भूमिका शहरी असो किंवा ग्रामीण मुक्ताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली. तिच्या अभिनयाचे चाहते प्रत्त्येक वयोगटात आहेत. कुणाला ‘डबलसीट’मधील समंजस मुक्ता भावली, ‘अग्निहोत्र’मधील मंजुळाला रसिक अजूनही विसरले नाहीत. अशा अभिनयसंपन्न चतुरस्त्र अभिनेत्रीला ‘पीपिंगमून’कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...