मुक्ता बर्वेचा पहिल्यांदाच डॅशिंग अंदाज, असा आहे ‘बंदिशाळा’चा ट्रेलर

By  
on  

अभिनेत्री मुक्ता बर्वेने आजवर विविध भूमिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. मुक्ता आता पोलिस अधिका-याच्या रुपात रसिकांसमोर येणार आहे. तिच्या बंदिशाळा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात मुक्ता शूर पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसत आहे. या ट्रेलरची सुरुवात महिलांवरील अत्याच्यारच्या घटनांनी होते. मुक्ता बर्वैच्या भूमिकांमध्ये नेहमीच विविध छटा आणि वैविध्य प्रेक्षकांना पाहायला मिळालंय, ‘बंदीशाळा’मधील हीसुध्दा एक आव्हानात्मकच भूमिकाच आहे. त्यामुळे सिनेमाबाबत कुतुहूल निर्माण झालं आहे.

https://www.youtube.com/watch?v=_diRJD7Fasw&t=12s

या सिनेमात मुक्तासोबत शरद पोंक्षे, उमेश जगताप, प्रवीण तरडे, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, सविता प्रभुणे याशिवाय इतर अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मिलिंद लेले या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. मुक्ता यात माधवी सावंत या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या सिनेमाची  पटकथा संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली आहे. ‘श्री माऊली मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत आणि ‘शांताई मोशन पिक्चर्स’ची पहिली निर्मिती असलेल्या या सिनेमामध्ये स्त्रियांवर होणा-या अत्याचारंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. स्वाती संजय पाटील या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. हा सिनेमा २१ जुनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share