बाळूमामांच्या अवतार कार्याची कक्षा रुंदावणार, मालिकेत येणार लीप

By  
on  

कलर्स मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक उत्तम मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्यापैकीच एक मालिका म्हणजे ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’. संत बाळूमामांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या या मालिकेने रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. यात बालरुपातील बाळूमामांची भूमिका बालकलाकार समर्थ पाटील यांने केली आहे. बाळूमामांच्या एकुणच व्यक्तिमत्त्वाला समर्थने अत्यंत यथायोग्य न्याय दिला आहे. यात रोहित देशमुख मयप्पाची तर अंकिता पनवेलकर सुंदराची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/p/BxeNNrdAbro/?utm_source=ig_web_copy_link

या मालिकेत सध्या बाळूमामांच्या लग्नाचा एपिसोड चालू आहे. पण लवकरच या मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. ही मालिका लीप घेणार असून आता युवावस्थेतील बाळूमामांचं दर्शन रसिकांना घडणार आहे. याचा एक प्रोमोही वाहिनीने रिलीज केला असून त्यात युवा बाळूमामांची झलक दिसत आहे. ही भूमिका साकारणा-या कलाकाराचं नाव समोर आलं नसलं तरी मलिका आणखी रंगतदार होणार हे नक्की !

Recommended

Loading...
Share