कलाकारांची बंडखोरीच शोमध्ये नवीन जान आणते : महेश मांजरेकर

By  
on  

सध्या तमाम मराठी रसिक ज्या शोची आतुरतेने वाट पहात आहे असा शो म्हणजे ‘मराठी बिग बॉस सीझन २’ या शोचा बिगुल वाजला आहे. या शोच्या सुत्रसंचलनाची धुरा महेश मांजरेकर यांच्याकडे आहे. आता तो प्रत्यक्षात कधी सुरु होतो याची वाट प्रेक्षक पाहात आहेत. बिग बॉसच्या दुस-या सीझनची औपचारिक घोषणा करण्यासाठी कलर्स मराठीने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर, वायाकॉम 18 चे बिझिनेस हेड निखिल साने, एंडमोल शाईन इंडियाचे सीईओ अभिषेक रेगे हे देखील उपस्थित होते. या परिषदेत दुस-या सीझनशी संबंधित अनेक नवीन आणि रंजक बाबी समोर आल्या.

यावेळी सुत्रसंचलानाविषयी बोलताना महेश मांजरेकर यांनी अनेक रंजक मुद्द्यांना हात घातला. हिंदी बिग बॉसमध्ये सलमानच्या सुत्रसंचलनाविषयी महेश म्हणतात, सलमानसोबत बिगबॉससंदर्भातल्या गप्पा नाही होत.. मी सलमानचे एपिसोड पाहिलेत .. पण त्याच्यासारखे करण्याची इच्छा होऊ नये.. सलमान is सलमान.. त्याला त्याची ओरिजीनॅलिटी.. आणि मला माझी ओरिजिनॅलिटी जपणं महत्वाचं आहे. he is very keen .. माझे  एपिसोड त्याने पाहिलेत.. he is very happy .. can't try to do what salman does त्याला आवडतं मी जे काही करतो ते. मी माझं केलं तरच सगळ्यांना आवडेल.’ यावेळी महेश यांनी मागील सीझनच्या आठवणीदेखील शेअर केल्या ते म्हणतात, ‘पहिल्या सीझनचे काही एपिसोड्स मला कसं वागायचं ते काहीच कळत नव्हतं. पण सीझन २मध्ये मात्र मी पुर्ण तयारीनिशी आलो आहे.’ यावेळी बिग बॉसमधील स्पर्धकांविषयीही महेश यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणतात, ‘ बिग बॉस हा मानवी मानसिकतेचा एका वेगळा पैलू समोर आणणारा शो आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती त्यांचे स्वभाव हे समोर येतात. यातील सेलिब्रिटीदेखील आपल्यासारखीच माणसं असतात. पण बिग बॉसचं हे सीझन कॉमन मॅनलाही सेलिब्रिटी बनवू शकतो’.

यावेळी निखील सानेंनी नव्या सीझनविषयी अनेक बाबी विषद केल्या. साने म्हणतात, ‘प्रत्येक स्पर्धक हा गप्पा मारायला नाही तर जिंकायला आलेला असतो. त्यामुळेच शो जास्त रंजक होतो’. याशिवाय कलाकारांच्या निवडीविषयीही निखिल यांनी मत व्यक्त केलं, ‘कास्टींग हा बिग बॉस शोचा आत्मा आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही.’ यावेळी अभिषेक रेगे यांनी शोबद्दल अधिक माहिती दिली. हा सीजन मागच्या सीझनपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक दर्जेदार करण्याच्या प्रयत्नात सर्व टीम आहे. यावेळी टास्क जास्तीत आव्हानात्मक कसे असतील यावरही भर दिला जाणार आहे. यावेळी बिग बॉसचा थरार लोणावळ्यात न रंगता गोरेगाव येथे रंगणार असल्याचंही या पत्रकार परिषेदेत सांगितलं आहे.

Recommended

Loading...
Share