आज होणार अनेक सत्यांची उकल, झी मराठीवर आजचा रविवार आहे महारविवार

By  
on  

आपल्या दर्जेदार मालिकांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीने आजवर अनेक हटके विषयावरील कार्यक्रम सादर केले आहेत. सध्या झी मराठीवरील मालिकाही रसिकांच्या खास पसंतीस उतरत आहेत. या वाहिनीवरील तीन मालिका रसिकांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकी एक स्वराज्यरक्षक संभाजी, माझ्या नव-याची बायको आणि ‘तुला पाहते रे’. या मालिकांचं कथानक आता एका रंजक वळणावर येऊन ठेपलं आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1129748473958477824

‘तुला पाहते रे’ या मालिकेत इशाला राजनंदिनीचं सत्य कळालं आहेच. पण विक्रांत सरंजामे म्ह्णजेच गजा पाटीलचा क्रुर चेहराही समोर आला आहे. संपत्तीच्या हव्यासासाठी राजनंदिनीचा खुन करणा-या विक्रांतला इशा कोणती शिक्षा देईल हे या भागात समजेल. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतही राधिकाचे ३५ कोटी चोरल्यानंतर गुरुनाथ तिला फसवण्यात यशस्वी झाला आहे. पण त्याची ही हुशारी राधिका फार काळ चालू देणार नाही. त्यामुळे राधिका या चोरीचा पर्दाफाश कसा करते हे पाहणं रंजक ठरेल.

https://twitter.com/zeemarathi/status/1129688076991836160

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत गडावर अनेक कटकारस्थानं शिजत आहेत. पण संभाजीराजेंच्या भेदक नजरेतून ना कारस्थान सुटतील ना त्यामागचे सुत्रधार. त्यामुळे या मालिकेत आता दृष्टांचा नि:पात अटळ आहे. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून रसिकांना या मालिकांचा आनंद घेता येणार आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1129378537054658561

Recommended

Loading...
Share