झी युवावरील फ्रेश विषयांवरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हटके विषय आणि उत्तम मांडणी यामुळे या वाहिनीवरील मालिकांने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या वाहिनीवरील आणखी एक मालिका ‘तु अशी जवळी रहा’ प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील मनवा आणि राजवीर यांच्या केमिस्ट्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावरच या मालिकेने २०० भागांचा टप्पा पुर्ण केला आहे. याचं सेलिब्रेशन नुकतंच मालिकेच्या सेटवर केक कापुन केलं गेलं.
या मालिकेत पत्नी मनवावर वेड्यासारखं प्रेम करणारा राजवीर तिला जगाच्या नजरेपासून लांब ठेवू पाहतोय. पण त्याच्या या अतिरेकी प्रेमाचा त्रास मात्र मनवाला वरचेवर त्रास होत असतो. आता यातुन मनवा कसा मार्ग काढते हे पाहणं रंजक ठरेल.