प्रेमाला वय नसतं असं म्हटलं जातं आणि नेमकं हाच विषय घेऊन ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक रसिकांच्या भेटीला आहे. या नाटकातून उतारवयातील प्रेमाचा एक वेगळाच पैलू समोर मांडला आहे. या नाटकाचा आज म्हणजे १९ मे ला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता २५० वा प्रयोग सादर होणार आहे. लीना भागवत आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिकांनी हे नाटक सजलेलं आहे. याशिवाय चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही भूमिका आहेत.
यावेळी खास कार्यक्रमाचं आयोजनही केलं आहे. उतारवयात व्यक्तीला जीवनसाथीच्या रुपात एका परिपुर्ण सोबती मिळत असतो. पण या नात्याला आंबट्गोड किनारही असते. मंगेश कदम दिग्दर्शित आणि शेखर ढवळीकर लिखित या नाटकातून नेमकं हेच सांगितलं आहे.