‘रात्रीस खेळ चाले’मधील हा कलाकार पडला प्रेमात, केला फोटो शेअर

By  
on  

भयपटांमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा नंबर सगळ्यात वरचा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. आण्णा, माई, वच्छी, शेवंता, दत्ता आणि सविता या व्यक्तिरेखांना रसिकांनी भरपुर प्रेम दिलं आहे. या मालिकेत आता काशीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आण्णांच्या कुटुंबाचा बदला वच्छी कसा घेणार हे पाहणं रंजक असणार आहे. ही मालिका आधीच्या मालिकेचा प्रीक्वेल आहे. मालिकेच्या पहिल्या भागात माधव आणि त्याचं कुटुंबदेखील दाखवलं होतं. यात माधवच्या मुलाची आर्चीसची देखील महत्त्वाची भूमिका होती. आर्चिस म्हणजे आदिश वैद्यने अलीकडेच त्याचं रिलेशनशीप स्टेट्स जाहीर केलं. आदिश रेवती लेलेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. रेवती अभिनेत्री आहेच याशिवाय कथ्थक नृत्यांगना आहे. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

https://www.instagram.com/p/BxNQhQ2lvW7/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxgwMJelqk9/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

Loading...
Share