रिंकू राजगुरुची पुन्हा ‘आर्चीगिरी, मेकअप सिनेमात दिसला बिनधास्त अंदाज

By  
on  

‘कागर’मधील अभिनयामुळे कौतुकाचा वर्षाव झाल्यानंतर रिंकू राजगुरुचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. रिंकू ‘मेकअप’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात रिंकूचा आर्चीसारखाच बिनधास्त अंदाज दिसून येत आहे. गणेश पंडित या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

https://www.youtube.com/watch?v=MB-cm7Iqr4k

या टीझरमध्ये रिंकू शोलेमधील धमेंद्र यांच्या टाकीवरील सीनची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. यात एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या रिंकूने दारुदेखील पिली आहे. त्याच नशेत ती ग्रामीण अंदाजात बडबड करताना दिसत आहे. या टीजरवरून रिंकूचा या सिनेमातही बिनधास्त रोल असणार हे स्पष्ट झालं आहे.

Recommended

Share