अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आजपर्यंत अनेक लूकमध्ये चाहत्यांच्या समोर आली आहे. पहिल्यांदा ती महाराष्ट्राची लाडकी अप्सरा बनली. अंजिठामधली आदिवासी कन्या झाली, बकुळा नामदेव घोटाळेमधील सालस बकुळा किंवा हंपी मधील मॉडर्न मुलगी असो. तिचं प्रत्येक रुप चाहत्यांना वेड लावत आलं आहे. पण आता मात्र सोनाली दबंग लूकमध्ये रसिकांच्या समोर आली आहे. सोनालीने नुकताच सोशल मिडियावर पोलिस वर्दीमधील फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/BxtrjY4FRUP/?utm_source=ig_web_copy_link
पोलिसांची वर्दी घालण्याचं खुप दिवसांचं स्वप्न असल्याचंही तिने बोलून दाखवलं आहे. यासोबत एक छोटा व्हिडियोदेखील तिने शेअर केला आहे. यासोबतच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते,
I always wanted to wear वर्दी
किक some criminals
and do it all with स्वैग ....
Now my wish has come ट्रू in a fictitious वर्ल्ड
so had a lot of फ़न too ...
cant wait to share it with यू
वॉच this space!
आता या अतरंगी कॅप्शनमुळे सोनालीचा आगामी प्रोजेक्ट धमाकेदार असणार याची खात्री रसिकांना पटली आहे.