अभिनयाचे शहेनशहा बिग बी आणि सुबोध भावे यांचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

By  
on  

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे यांचा हा फोटो पाहून हे दोघं नक्की एकत्र करतायत तरी काय,हे जाणून घेण्याची तुम्हालासुध्दा उत्सुकता असेल. अभिनयाचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असतं आणि ते साकार होण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

अभिनेता सुबोध भावेच्याबाबतीत त्याचं स्वप्न नुकतंच सत्यात उतरतंय आणि याचं निमित्त होतं, ते म्हणजे बिग बीचं 25 वर्षानंतर मराठीत पदार्पण. मिलींद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व अभिनेता सुबोध भावे यांचीसुध्दा प्रमुख भूमिका असून या सिनेमाच्या शूटींगला कालपासून सुरुवात झाली.

शुटींगला सुरुवात झाल्यावर भावूक होत सुबोधने बिग बींसोबतचा फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली, सुबोध म्हणतो, "निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं.
कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत.
मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार."

 

https://www.instagram.com/p/Bxv5yHrBiTF/?igshid=wjk8obtkzsql

Recommended

Loading...
Share