सिनेसृष्टीत कलाकारांच्या ब्रेक अप्स आणि लिंक अप्सच्या चर्चा वारंवार जोर धरतात.नवीन कलाकारांच्याबाबत तर या गोष्टी नेहमीच घडतात. मराठी सिनेसृष्टीतील एका नव्या जोडीबाबतही असंच काहीसं घडलं आहे. ‘अशी ही आशिकी’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनय-हेमल या जोडीबाबतही असंच काहीसं घडत आहे. या फ्रेश जोडीच्या लिंक अप्सच्या बातम्या रंगवून सांगितल्या जात आहेत.
ही जोडी ब-याच ठिकाणी एकत्र पाहायला मिळते. अशावेळी त्यंच्या नात्याबाबत चर्चा होणं सहाजिक आहे. पण अभिनयने मात्र याबद्द्ल खुलासा केला आहे. तो म्हणतो, ‘हेमल इंगळे आणि माझ्यात केवळ मैत्री आहे.’ त्यामुळे सध्यातरी मराठी सिनेसृष्टीत हे लव्हबर्डस नसल्याचं स्पष्ट झालं होतं. ‘अशी ही आशिकी’ सिनेमातील या दोघांच्या केमिस्ट्रीला रसिकांनी पसंती दर्शवली होती. अभिनय अलीकडेच रवी जाधव यांच्या ‘रंपाट’ सिनेमातही दिसला होता.