‘तुला पाहते रे’च्या सेटवर सगळेच बनले आहेत ‘आम’दार, पाहा कोण आहेत यात

By  
on  

झी मराठीवरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे ‘तुला पाहते रे’. अल्पावधीतच या सिनेमाने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. विक्रांत सरंजामेवर जीवापाड प्रेम करणा-या इशा समोर विक्रांतचं खरं स्वरुप आल्यानंतर तिला चांगलाच धक्का बसला आहे. विक्रांतला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्याचंही तिने ठरवलं आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1131199788664406016

मलिकेत इतकी गरमा गरमी असताना सेटवर मात्र मजा मस्ती सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी नुकताच सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यात शोमधील प्रत्येकाच्या हातात एक आंबा दिसत आहे. या फोटोला सुबोधनी कॅप्शनदेखील तितकंच मजेदार दिलं आहे. सुबोध म्ह्णतात, ‘हम जैसे आम लोगोंको आम बहुत पसंद है!!! तुला पाहते रे च्या सेट वर खूप दिवसांनी सगळे एकत्र. हा फोटो पाहता कथानकाचं टेन्शन बाजूला ठेवून या मंडळींनी आंब्याचा सीझन एंजॉय केलेला दिसतोय.

Recommended

Loading...
Share