By  
on  

सुमित राघवन म्हणतोय 'राधे राधे', कशासाठी ते जाणून घ्या सविस्तर

अभिनेता सुमित राघवन हा उत्तम गायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने संगीत नाटकात कामही केलं आहे. मात्र पहिल्यांदाच त्यानं सिनेमातही गाणं गायलं आहे. 'वेलकम होम' या सिनेमात सुमितनं 'राधे राधे' हे गाणं गायलं असून, विशेष म्हणजे, बंगाली शैलीत असलेलं गाणं सुमितनं कोणत्याही वाद्यांच्या साथसंगतीविना गायलं आहे.

सिनेमाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तर सिनेमात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, प्रसाद ओक, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम कलाकारांची फौज आहे. सिनेमाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

सुमीत राघवन सिनेमातील आपल्या पार्श्वगीताच्या अनुभवाविषयी म्हणतो, 'सिनेमात गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. त्यातलं एक व्हर्जन मला गाण्याची संधी मिळाली. अत्यंत श्रवणीय असं हे गाणं आहे. गाण्याचं दुसरं व्हर्जन सिनेमात पार्श्वगीत म्हणून येतं. या गाण्यामुळे पहिल्यांदाच सिनेमात गाणं गाता आलं,' असं

' सिनेमात माझी सुरेश नावाची व्यक्तिरेखा आहे. खूप छान प्रकारे ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. एका दिवसात घडणारी ही गोष्ट आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासह, मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्यासारख्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा म्हणजे खूप छान अनुभव होता.' असंही सुमितनं सांगितलं.

https://youtu.be/9l-qa928M7c

'वेलकम होम' हा कौटुंबिक सिनेमा येत्या १४ जूनला हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive