By  
on  

अक्षय टाकसाळेला भेटला ‘हा’ देव, इन्स्टावर केला फोटो शेअर

प्रत्येक कलाकाराचं महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न  असतं. प्रत्येक कलाकार बिग बींना आदर्श मानत असतो. आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटावं. त्याच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनेता अक्षय टांकसाळेचंही असंच काहीसं मत आहे. अक्षयने त्याच्या या देवासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अक्षयचा हा देव दुसरं तिसरं कोणी नसून बिग बी अमिताभ बच्चन आहेत.

https://www.instagram.com/p/Bx1XQCBnFnf/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय अमिताभ बच्चन यांच्यसोबत ‘ए बी आणि सी डी’ या सिनेमात झळकणार आहे. मिलिंद लेले या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. या सिनेमाची पटकथा हेमंत ऐदलाबादकर यांनी लिहिली आहे. या सिनेमात रसिकांना अमिताभ आणि विक्रम गोखले यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अक्षय यापुर्वी yz सिनेमातील ‘ओ काका’ या गाण्यात चमकला होता. याशिवाय अक्षयने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णीसोबत  पोश्टर गर्लमध्येही तो दिसला होता. ‘पार्टी’ ‘गॅटमॅट’ या सिनेमाव्यतिरिक्त तो ‘अश्लील मित्रमंडळ’ या सिनेमात दिसेल.

Recommended

PeepingMoon Exclusive