By  
on  

पुष्कर जोग आणि त्याच्या लेकीचा हा क्युट व्हिडियो पाहताच तुम्ही म्हणाल वा !

कलाकार पडद्यावर कितीही कणखर आणि सक्षम दिसत असले तरी त्यांच्याही मनात कुठेतरी हळवा कोपरा असतो. या हळव्या कोप-यात सगळ्यात जास्त जागा असते लेकिंना. मराठी सिनेसृष्टीतील कणखर, स्टायलिश हिरो जेव्हा लेकींसोबत वेळ घालवतात त्यावेळी अधिकच हॅण्डसम दिसतात असं म्हटलं तर चुकिचं ठरणार नाही. अलीकडेच पुष्कर जोगने लेकीसोबतच्या ‘फन टाईम’चा व्हिडियो शेअर केला आहे. बिझी शेड्युलमधून वेळ काढून पुष्करने लेकीसोबत दंगामस्ती केली. पुष्करची लेक त्याला भेटायला ‘बिग बॉस’च्या घरातही आली होती. त्यावेळी क्युटनेसने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं.

https://www.instagram.com/p/Bx1wLSNlYAh/?utm_source=ig_web_copy_link

अलीकडेच पुष्करचा ‘ती अ‍ॅण्ड ती’ हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात तो प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णीसोबत दिसला होता. पुष्कर आता वेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या समोर येत आहे. त्याच्या वेबपदार्पणाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive