By  
on  

56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 

56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला. तर उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पट‍काविला.

 

 सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाल)

 सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )

 सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)

 सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)

 सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)

 सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)

 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानाडे ( व्हॉट अप लग्न)

 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

 सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -उमेश जाधव ( मेनका उर्वशी)

 सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी )

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -मुक्ता बर्वे (बंदीशाला )

 सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- स्वानंद किरकिरे ( चुंबक )

 सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री-छाया क़दम ( न्यूड )

 सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख ( तेंडल्या)

 सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

 सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिति- शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)

 सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)

 सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive