By  
on  

‘मिडियम स्पाईसी’ असलेला ललित प्रभाकर घडवतोय सेटवरच्या घराची सफर

सध्या ‘मिडियम स्पाईसी’ असं चटपटीत नाव असलेल्या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या सिनेमात  सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या त्रिकुटाचं मेतकुट जमलं आहे. ललितने नुकताच सेटवरून एक व्हिडियो शेअर केला आहे. यात तो सिनेमातील त्याच्या खोलीचा व्ह्यु शेअर केला आहे. यात तो खोलीतील वेगवेगळ्या वस्तू दाखवत आहे. पण त्या वस्तूंमागचं कारण मात्र त्याने गुलदस्त्यात ठेवलं आहे.

https://youtu.be/rSB9al5xnFw

रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव मोहित टाकळकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. विधी कासलीवाल या सिनेमाच्या निर्मात्या आहे. ‘मिडियम स्पाईसी’ हा नात्यांवर भाष्य करणारा आधुनिक काळातील सिनेमा आहे. लॅंडमार्क फिल्मस हा सिनेमा प्रस्तुत करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive