मृण्मयी सिद्धार्थ आळवत आहेत विरहाचा सुर, ‘मिस यु मिस्टर’चं नवं गाणं रिलीज

By  
on  

आजकाल अनेक व्यक्ती काही कामानिमित्त परदेशात असतात. अशा वेळी त्यांच्यात आणि जवळच्या व्यक्तींमधील भावबंध मिस यु मिस्टर’च्या नव्या गाण्यात सहज जाणवून येतात. या गाण्याचे ‘तुझी आठवण’ असे बोल आहेत. परदेशी चाललेल्या सिद्धार्थच्या आणि त्याला निरोप देणा-या मृण्मयीच्या चेह-यावरची हुरहूर स्पष्ट दिसत आहे. अंतर कितीही असलं तरी नात्यातले बंध कसे जपावे हे गाण्यात दिसून येतं. सिद्धार्थ या सिनेमात वरुण तर मृण्मयी कावेरीच्या भूमिकेत आहे. हे गाणं आनंदी जोशी आणि आलाप देसाई यांनी गायलं आहे. गाण्याला वैभव जोशीचे बोल आहेत. तर संगीत आलाप देसाईचं आहे. रोमॅंटिक टच असलेलं हे हलकं फुलकं गाणं रसिकांना नक्कीच आवडेल. हा सिनेमा २१ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

https://www.youtube.com/watch?v=HHLC-P0LY8g

Recommended

Loading...
Share